Social Icons

twitterfacebookgoogle pluslinkedinrss feedemail

सोमवार, २८ मे, २०१२

कारण माझ्या अश्रुंचे...




कधी कधी मनात विचार येतात….


मला ते विचार सारखे तुझ्याकडे नेतात…


तुझ्या सोबतचे सर्व क्षण डोळ्यात उभे राहतात…


अश्रूंच्या रूपाने डोळ्यातून कधी कधी बाहेर येतात….

गुरुवार, २४ मे, २०१२

विरहात तुझ्या...




तुझ्या विरहात....
थंड वारा झोंबतो अंगाला...
अशे वाटते जणू...
तो तुला शिउन आला आहे...


-शेवटी एकटाच...

तू आणि तुझ्या आठवणी...




तुझ्या आठवणी...
तुझ्याहून जास्त मला छळतात...
जेंव्हा दिसतो मी एकटा...
तेंव्हाच मला सतावतात...


-शेवटी एकटाच...

अशेच माझ्ये प्रेम.....



प्रेमात किती काही सहले...
तरी देखील...
रस्ता हि नाही बदलला...
आणि अंत हि नाही शोधला...


-शेवटी एकटाच...

माझे दुखः...





तिने दिलेले दुखः...
इतके मोठे होते...
कि सांगितले असते...
तर सुनामी आली असती...


-शेवटी एकटाच...

कशे समजाऊ ह्या हृदयाला....





दुखः झेलून पण..
हा नाही ऐकणार...
हृदय एके दिवशी....
मी काढून फेकणार....


-शेवटी एकटाच...

तुझी आठवण जेंव्हा येते...




तुझी आठवण आली कि...
का मी स्वतः ला विसरतो....
तुला विसरणे शक्य नाही...
म्हणून मरणावर मी प्रेम करतो....


-शेवटी एकटाच....

कधी भेटेल ती मला....




कधी भेटेल ती माझ्या स्वप्नातली परी…
कधी भेटेल ती रोज रोज माझ्या स्वप्नात येणारी….
आपल्या कोमला स्पर्शाने मला मला मोहून टाकणारी…
कधी भेटेल ती माझी सोनपरी….

कधी भेटेल ती माझ्ये मन सामाझ्णारी…
कधी भेटेल ती जीवनात पलाय मला सर्व काही मानणारी…
सर्वांच्या आधी मला मान देणारी…
कधी भेटेल ती माझ्या साठी जगणारी…

कधी भेटेल ती माझ्या सोबत दिवस रात्र बोलणारी…
कधी भेटेल ती मला दिवस रात्र जागवणारी…
बोलता बोलता आपले सुख-दुखः सर्व काही वाटून घेणारी…
कधी भेटेल ती माझी स्वप्नपरी….

कधी भेटेल ती माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी…
कधी भेटेल ती माझ्ये दुखः समजणारी…
वाटून घेईन सर्व काही तिच्या शी….
कधी भेटेल ती मला स्वताचे सामाझ्णारी…

कधी भेटेल ती मला कुशीत घेणारी,,,,
कधी भेटेल ती माझ्या छातीवर आपले डोके ठेवणारी….
माझ्या  हृदयाचे खोके ऐकणारी…
कधी भेटेल ती अशे प्रेम करणारी…
कधी भेटेल ती अशे प्रेम करणारी…
कधी भेटेल ती अशे प्रेम करणारी…

- शेवटी एकटाच...

अशी असावी मैत्री...




मैत्री असावी मना मनाची…
मैत्री असावी प्रेमाची…
मैत्री नसावी बंधने…
मैत्री असावी भावनांची…

मैत्री असावी विश्वासाची…
मैत्री असावी त्यागाची…
मैत्रीत नसावी कसलीच बंधने….
मैत्री असावी बलिदानाची…

मैत्री असावी निरपेक्ष…
मैत्री असावी एकनिष्ट…
मैत्रीत नसावे कमीपणा…
मैत्रीत असावी मित्रच श्रेष्ट…

मैत्रीत असावी मस्ती..
मैरीत असावी जोडी मनाची…
मैत्रीत असावे हे सर्व काही… 
अशी मैत्री असावी तुझी आणि माझी…

- शेवटी एकटाच...

रविवार, २० मे, २०१२

---जीवन “I Quit”---



जीवनात काही उणीव असते…

जीवनात काही दुखः असते…
I Quit म्हणण्या पर्यंत….
आयुष्य इतके वाईट असते…

पिजर्यात अडकलेल्या प्राण्याला…
काचेया पेटीतल्या जीवाला…
I Quit म्हणावे तर भरपूर वाटते..
विरह झालेल्या मनाला…

इच्छा, आकांक्षा खूप हवी…
जिद्द आपण बाळगायला हवी…
प्रत्येकाला जीवन जगण्या आधी..
पुन्हा स्वप्ने बघायला हवी…

कोणती हि गोष्ट सोडण्य साठी…
मित्रांच्या मिठीत येऊन बघावे…
जीवन जगायला खूप सुंदर आहे…
जीवन थोडे जागून पाहावे…


-शेवटी एकटाच...

गुरुवार, १७ मे, २०१२

तुला पाहतो मी...



तुला पाहतो मी...

तुला पाहतो मी, मनास येतो धीर,
तुला भेटण्यासाठी जीव होतो अधिर,
तरिही मनाला भयाचे भुलावे,
कसे मी तुला आपले रे म्हणावे,
तुझी माझी तुलना जसे नीर क्षीर,
तरी वेडी आशा नि वेडाच धीर,
तरी तुला पाहतो मी मना येतो धीर,
तुला भेटण्यासाठी जीव होतो अधिर,
तुझे हासणे चंद्र फुलतो जसा हा तुझे चांदणे,
जन्म वेडा पिसा हा तुझे स्वप्न सत्यात,
भीनले अचानक जसे शब्द दोह्यात,
सर्व ठिकाणी तुलाच पाहतो मी,
मना येतो धीर तुला भेटण्यासाठी जीव होतो अधिर,

-शेवटी एकटाच...

काही आठवणी असतात विसरण्यासाठी…



काही आठवणी असतात विसरण्यासाठी…
किती माने जाळली ते गूढ उकलण्यासाठी…
कि ज्योत आहे जळण्या साठी कि जाळण्यासाठी…
रडणार्याला रडण्याचा अर्थ कसा कळणार…
अश्रू हे रडण्या साठी आहेत कि रडवण्या साठी…

चंद्र हि जगात असतो हे उत्तर शोधण्यासाठी…
कि सूर्य हा उगवण्य साठी कि मावळण्यासाठी…
कोणाला ह्याचा तरी अर्थ माहित आहे का…
कि डोळे जागण्या साठी आहेत का झोपण्यासाठी…

किती किनारे तरसले हे शोधण्यासाठी…
लाटा असतात नक्की कोणासाठी…
आहोटीला त्या आता येतात मिलनासाठी…
आणि भरतीला निघून जातात विरहासाठी….

किती कविता केल्या मी हि त्यासाठी…
कि कविता असतात तिला विस्राय्साठी कि आठवय्साठी…
आठवणाऱ्याला त्याचा अर्थ सुद्धा काळात नाही…
कि काही आठवणी असतात विसरण्या साठी…

-शेवटी एकटाच...


मंगळवार, १५ मे, २०१२

तुझी आस...


तुझ्यावर प्रेम आहे…
आणि मरणावर पण विश्वास आहे…
बघूया पहिले काय येते नशिबी…
मला तर दोघांचीहि आस आहे…


-शेवटी एकटाच...

तू हवियेस...



आज प्रत्येक क्षणात तूच दिसतेस...
मला नकार देताना माझ्यावर हसतेस…
मनाला लागते जेंव्हा तू सोबत नसतेस…
तरी प्रत्येक क्षणात मनात तूच असतेस…


-शेवटी एकटाच...

जीवन अशेच चालते...


परतीच्या वाटेची तमा असते प्रत्येक पाखराला…
संध्याकाळ झाली कि परत फिरतो प्रत्येक घराला…
गेलेला वेळ परत येईल अशी तमन्ना असते प्रत्येकाला…
गेलेले दिवस परत येत नाहीत कशे समजाऊ ह्या मनाला…
मनाला वेडे बनवायची कला अवगत असते प्रत्येकाला….

- शेवटी एकटाच...

बाळू


मला एक बोला....

वाळू वरचा बाळू कधी पाहिलात तुम्ही?????


वाळू वरच्या बाळू ला...
सुचली एक कविता...
त्याने उचलली पाटी....
पण त्याला येताच नाही लिहिता...

-शेवटी एकटाच....

सोमवार, १४ मे, २०१२

♥♥♥ पहिला पाऊस ♥♥♥


पहिल्या पावसात कासावीस होते मान,,,
पावसात भिजताना होते तुझी आठवण,,,
आठवतात ते दिवस ज्यात तू होती सोबत,,,
तुझ्या सोबत भिजताना विसरायचो प्रेत्येक क्षण♥♥

-हेमंत चव्हाण.

पुन्हा एकदा...♥♥♥





पुन्हा एकदा भेटायचय...
खूप दिवसानंतर तुला डोळे भरून पहायचय
पुन्हा एकदा भेटायचय...
तुझ्या हातात हात घालून खूप खूप फिरायचय
पुन्हा एकदा भेटायचय...
तुझ्या खांद्यावर डोके ठेऊन शांत प्रेम अनुभावायचंय
पुन्हा एकदा भेटायचय...
तुझ्यासाठी झुरलेल्या क्षणांना तू मजाच आहे दाखवून द्यायचंय
पुन्हा एकदा भेटायचय...
माजे बोलणे कधीच बोलबच्चन नवते हे तुला पटवून द्यायचंय
पुन्हा एकदा भेटायचय...
विरहात सहन केलेल्या क्षणांना थोडाकाळ तरी घालवायचं
पुन्हा एकदा भेटायचय...
रोज रात्रीच्या स्वप्नांना एक क्षन तरी खरा करायचं
पुन्हा एकदा भेटायचय...
नाही जलस मजा तरी एकदा तुझ्या गळ्यात पडून खूप खूप रडायचं
बोल ना पुन्हा एकदा भेटायचय♥♥♥

--हेमंत चव्हाण.

शनिवार, १२ मे, २०१२

हाक




हाक तुझी ऐकण्यासाठी मन माझ्ये आतुरते,,,
भिजलेल्या डोळ्यांनी पापणी लावते...
कशे थांबवू तुला गोंधळलेल्या परिस्थितीत...
दूर जाताना तू पाठमोरी दिसते...
हाक मारण्याचा केला होता प्रेयात्ना...
कंठातून आवाज आलाच नाही...          
हुंदके देता देता कदाचित...
प्रयत्न मी केलाच नाही....
तुझ्या आठवणींच्या दर्वालीने आत्ता...
माझ्ये मन भरलेले राहील...
तू माझ्ये जीवनातले एक अविभाज्य स्वप्न आहे....
ज्याला मी रोज रात्री पाहत राहेन....
ज्याला मी रोज रात्री पाहत राहेन...
ज्याला मी रोज रात्री पाहत राहेन...


- हेमंत चव्हाण.

शुक्रवार, ११ मे, २०१२

जेंव्हा मी कविता लिहितो


माझ्या कवितेच्या दुनियेत तू मला भेटतेस…
कविता लिहिता लिहिता तू जवळ भासतेस…
मानून कदचीत कविता लिहितो मी…
माझ्या कवितेत तरी तू माझ्या सोबत वाटतेस….

-हेमंत चव्हाण.

गुरुवार, १० मे, २०१२

तिच्या शिवाय मी



तिच्यावर कविता काय लिहू लिहिण्या साठी काही नाही…
लिहून लीळून संपले शब्द बोलाय्साठी हि काही नाही…
शाढत होतो मी तुलाच सर्वीकडे…
तीच मला मिळत नाही…
कशे सुचणार तिच्याबाद्ध्ल काही तीच मला दिसत नाही…
चालता चालता तिलाच शोधतो…
दिसल्यावर न दिसल्या सरख्ये करतो..
बोलावेशे तर खूप वाटते…
पण न बघितल्या सरख्ये करतो….
अशे तिने का केले हेच सरख्ये आठवतो…
तिला आठउन आठउनाच मी तिच्यावर खूप प्रेम करतो…
मला माफ कर अशे बोलायचा हि मी खूप विचार करतो…
तिच्या प्रेमाची भिक मागायचा मी नेहमी निर्धार करतो…
पण ती परत नाय बोलली तर परत हृदय तुटेल…
जे कशे बाशे सांभाळून ठेवले आहे ते परत तिला विसरायला जुटेल…
मानून तर जगतो आहे योग्य वेळेची वाट पाहत…
आणि काढतो रात्र रात्र तिच्या प्रेमात जगात….

- हेमंत चव्हाण.

बुधवार, ९ मे, २०१२

ती आणि मी


जीवनाच्या वाटेव तिची गरज होती....
प्रत्येक वळणार मला तिचीच सवय होती....
का विसरली ती सर्व काही ....
ज्याची आम्हा दोघांना गरज होती....

- हेमंत चव्हाण.

एक एकटा एकटाच




एकटेपणा भासतो मज त्याशनी….
ज्याशनी आठवण येते तुझी माझ्यामनी…
एक एकटा राहतो मी त्या दिवशी…
ज्यादिवशी दुझा आभास होतो…

प्रत्येक वस्तुत तू मला दिसते…
प्रत्येक स्थितीत तू मला दिसतेस…
तू मला भेटत का नाहीस…
प्रत्येक जागी तू मला दिसतेस…

का करतो तुझ्यावर प्रेम मी इतके…
मला माझ्येच काळात नाही…
का आठवतो मी तुला इतके…
कारण मला उमगत नाही…

ज्या दिवशी बंद होतील माझ्ये डोळे…
त्या दिवशी तुझ्या डोळ्यांतून पण पाणी येईल…
बोलायचीस कि खूप सतावायचा मला…
पण त्याच दिवशी तू माझ्यासाठी तारास्शील…

-हेमंत चव्हाण.

कविता वाचून कंटाळा आला आशेल तर या गेम ख्ळूया...माझा रेकॉर्ड तोडून दाखवा...

"फक्त कवी आणि लेखकांसाठी"

येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------