Social Icons

twitterfacebookgoogle pluslinkedinrss feedemail

बुधवार, २८ मार्च, २०१२

प्रेम म्हणजे काय असतं ते...


प्रेम म्हणजे काय असतं ते
पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली पवईलेकवरच्या प्रेमीयुगुलांना पहातोना.. जीव खुप जळतो रे.. शपथ...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे!
अजुन वेळ गेलेली नाही मित्रा.. काही तरी कर
पण काय करु कुणी मला प्रपोज करतच नाही.....


-ⒽⒸशेवटी एकटाच...*
● ● ●● ● ●● ● ●● ● ●● ● ●● ● ●● ● ●● ● ●

★कुणीतरी आठवणं काढतय★



कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......★

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......★


बाकी काही नाही
हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील...
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन..
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही..
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता...
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता...
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल...
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल...
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही...
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल...
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल...
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास...
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास..
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही...
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका...
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता..
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे...
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे...
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही...

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"

                          --ⒽⒸशेवटी एकटाच...*

मंगळवार, २७ मार्च, २०१२

तिची गरज....


जीवनाच्या वाटेवर तिची गरज होती....
प्रत्येक वळणार मला तिचीच सवय होती....
का विसरली ती सर्व काही ....
ज्याची आम्हा दोघांना गरज होती....


-ⒽⒸशेवटी एकटाच...*
★══════════★★═══════★

रविवार, २५ मार्च, २०१२

प्रत्येक रविवारी तुझी आठवण येते....

••••••★★•••••••••••••••★★•••••••••••••••★★
प्रत्येक रविवारी तिची आठवण येते....</3

हि आठवण मला तिच्याकडे नेते ...</3

कशे विसरू ते क्षण तिच्या सानिध्यातले ...</3

त्या सर्व क्षणाना परत उजाळा देते .....</3



-ⒽⒸ*-शेवटी एकटाच...*

★══════════★★═══════★ 

कविता वाचून कंटाळा आला आशेल तर या गेम ख्ळूया...माझा रेकॉर्ड तोडून दाखवा...

"फक्त कवी आणि लेखकांसाठी"

येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------