Social Icons

twitterfacebookgoogle pluslinkedinrss feedemail

मंगळवार, १ एप्रिल, २०१४

माझ प्रेम


माझ प्रेम 



तुझ्या माझ्या भेटीचा मेळ लागेल कसा
तू तिकडे अन मी इकडे झाल्या पल्लवित आशा

निर्भीड नजर ती तुझी भेदून गेली आरपार 
न थांग लागला मनाला हृदयी बसलीस तू यार

झाले अशक्य विस्मरण तू जिंकलेस माझे मन
परतुनी वात पाहतो तू करतेस न मला स्मरण

का झुरतो आहे मी एकटाच वाट तुझ्या येण्याची पाहत
माझे मला न ठाऊक योग्य आहे न हि वहिवाट.


रचनाकार
बनसोडे दत्तात्रय भरत
dattabansode333@gmail.com




प्रिये सखे ...................


प्रिये सखे ...................


त्या रसत्यावरची तुझी सावली 
अशी माझ्यापासून का दुरावली
प्रीत भरल्या नजरेने पाहताना 
माझी पापणी ही पान्हावली 


विकास शेळके 
vikasshelke001@gmail.com

कविता वाचून कंटाळा आला आशेल तर या गेम ख्ळूया...माझा रेकॉर्ड तोडून दाखवा...

"फक्त कवी आणि लेखकांसाठी"

येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------